संस्थेची ध्येय व धोरणे

   ध्येय दृष्टी -

     अनुभवग्रहण ते जीवनविकास या विद्यार्थ्याच्या शिक्षण प्रक्रियेला आनंद यात्रेत रुपांतरीत करणे.

   जीवितकार्य -

     १. विद्यार्थ्यांच्या प्रकट / सुप्त क्षमता वं कौशल्य ह्यांच्या त्यांच्या शिक्षणातून अधिकाधिक विकास साधने.

     २. व्यक्तिगत वं राष्टीय चारित्र्याची जडणघडण करून सुसंस्कृत व्यक्तिमत्व व सुजाण नागरिकत्व यांची जोपासना करण्यासाठी प्रयत्नशील राहणे.

     ३. ज्ञानग्रहण ते ज्ञाननिर्मिती यांना सर्व शिक्षण प्रक्रियेत सुप्रतिष्ठित करणे.

   कार्यसंस्कृती -

     'आदर्श परिवार' शिक्षककेंद्री शिक्षणाकडून विद्यार्थीकेंद्री शिक्षणाकडे वाटचाल करत आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक आणि भावनिक विकासातून त्याला त्याच्या 'स्व' चा शोध लागणार आहे. कृतीकेंद्री आणि आनंददायी शिक्षणाच्या सामर्थ्यावर आमचा पुर्ण विश्वास आहे. अशा शिक्षणातून आयुष्यातील कृतार्थतेचा शोध घेण्यास प्रवृत्त होऊन, जीवन प्रवासासाठी निघणारा विद्यर्थी घडविणे. त्यासाठी आम्ही सर्व व्यक्तिगत आणि सांघिकरित्या प्रयत्नशील आहोत. ह्या उदात्त ध्येयासाठी आम्ही सर्व आमच्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी नित्य प्रत्नशील आहोत.